आयुष्मान कार्डचे फायदे ? Ayushman Card म्हणजे काय ?

आपल्याला माहित आहे की आपल्या गावात Ayushman Card काढण्यासाठी csc चे लोक आलेले आहेत. आणि आपण तेथे जाऊन आपले कार्ड काढून घेता. पण Ayushman Card आयुष्मान कार्डचे फायदे आपल्याला माहिती आहेत का माहिती नसेल तर लेखात संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

आयुष्मान कार्डला गोल्डन कार्ड सुद्धा म्हटले जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना असेही कार्डवर आहे.

आपल्या देशातील सर्व वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केलेली आहे. हि योजनाच म्हणजे आयुष्मान भारत योजना होय. हि जगातील मोठी आरोग्यविषयक योजना असून या योजनेद्वारे कोट्यवधी लोक यातून लाभ घेणार आहेत.

या योजनेद्वारे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. हि योजना मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०१८ रोजी सुरु केली असून तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालीलप्रमाणे अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

आयुष्मान भारत योजना पात्रता

आपल्याला आयुष्मान कार्ड काढण्यासाठी कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आहेत हे सर्वात प्रथम माहिती करून घेणे गरजेचे आहे.

सरकारने हि योजना गरीब कुटूंबातील गटासाठी सुरु केलेली आहे. यामध्ये आदिवासी ( SC/ST) , निराधार, बेघर,, मजूर, दान भिक्षा मागणारी व्यक्ती,तसेच रेशन धान्य मिळणारे कुटूंब यांना या योजेनचा लाभ घेता येणार आहे.

योजेसाठी कोणकोणती कागपत्रे लागतात

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • मोबाईल नंबर ( आधार लिंक असलेला )
  • प्रत्यक्ष फोटो

कोणत्या सुविधा मिळतात.

या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड आहे त्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात ५ लाखापर्यंत मोफत उपचार करता येईल. सरकारी रुग्णायालयत दाखल झाल्यानंतर पुढील १५ दिवसापर्यंत सरकार यावर खर्च करणार आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. हि योजना कॅशलेस असून उपचारासाठी आपल्याला १ रुपया हि खर्च करावा लागणार नाही.

आयुष्मान कार्ड कसे बनवाल

आयुष्मान कार्ड हे तुम्ही घरबसल्या स्वतः काढू शकता. आपण मोबाईल अँप च्या साह्यायाने फक्त ५ मिनिटात आपले आयुष्मान कार्ड बनवू शकता. खालीलप्रमाणे व्हिडिओ बनवण्यात आला असून त्याप्रमाणे आपण आपले कार्ड बनवा. आयुष्मान भारत गोल्डन कार्ड बनवण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.

shivsurya: