३ लाखापेक्षा जास्त वैयक्तिक अनुदान मिळवा असा करा अर्ज

rojgar hami yojana maharashtra | rojgar hami yojana maharashtra 2021 | application form nrega | rojgar hami yojana maharashtra application form download । वैयक्तिक अनुदान मिळवा । गाय गोठा अनुदान अर्ज ।

आपल्याला जलसिंचन विहीर,वैयक्तिक शौचालय, शेळी पालन शेड, कुक्कटपालन शेड, घरकुल ( रमाई / इंदीरा आवास योजना ), घरकुल ( प्रधानमंत्री आवास योजना ), नाडेप कंपोस्टीग गांडुळ खत ( खड्डा ) तुती लागवड व किटक संगोपण गृह तयार करणे, शोष खड्डा ( नांदेड पॅटर्न ), विहीर पुर्नरभरण शेत बांध बंधिस्ती संजीवक किंवा अमृतपाण्याससाठी खड्डा वैयक्तिक, शेततळे, शेतक – याच्या शेत बाधावर वृक्ष लागवड, गाय गोठे, फळबाग लागवड, वैयक्तिक लाभ १८ प्रकारची वैयक्तिक अनुदान घ्यायचे आहे का त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल त्यासाठी अनुदान किती मिळणार हि सर्व माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता.

सर्वात प्रथम आपल्याला आपल्या ग्रामपंचायतला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या नावे लिहावा त्याच्या पूर्ण स्टेप खालील प्रमाणे पहा .

१) अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहा व पत्ता आणि मोबाईल क्रमांक

२) खालील पैकी जे लाभ आपल्याला या योजनेतून हवे आहेत त्या कामाच्या नावासमोर बरोबर टिक करा .

वैयक्तिक कामाचे प्रकार

१) वैयक्तिक शौचालय, २) शेळी पालन शेड, ३) कुक्कटपालन शेड, ४) घरकुल ( रमाई / इंदीरा आवास योजना ), ५) घरकुल ( प्रधानमंत्री आवास योजना ), ६) वैयक्तिक जलसिंचन विहीर,७) गांडुळ खत ( खड्डा ), ८) तुती लागवड व किटक संगोपण गृह तयार करणे, ९) शोष खड्डा ( नांदेड पॅटर्न ), १०) विहीर पुर्नरभरण, ११) शेत बांध बंधिस्ती, १२) संजीवक किंवा अमृतपाण्याससाठी खड्डा, १३) शेततळे,१४) शेतक – याच्या शेत बाधावर वृक्ष लागवड, १५) गाय गोठे, १६) फळबाग लागवड, १७) नाडेप कंपोस्टीग, १८) इतर वैयक्तिक लाभ

अनुदान किती मिळणार मजूर दराप्रमाणे

१)वैयक्तिक शौचालय १२०००/-
२)शेळी पालन शेड४९२८४/-
३) कुक्कटपालन शेड ४९७६०/-
४) घरकुल ( रमाई / इंदीरा आवास योजना )१६०००/-
५)घरकुल ( प्रधानमंत्री आवास योजना )१८०००/-
६) वैयक्तिक जलसिंचन विहीर३२७७७०/-
७) गांडुळ खत ( खड्डा )९०००/-
८)तुती लागवड व किटक संगोपण गृह तयार करणे३२६७९०/-
९) शोष खड्डा ( नांदेड पॅटर्न )२४६६/-
१०) विहीर पुर्नरभरण१५७१०/-
११)शेत बांध बंधिस्ती१७४४४/-
१२) संजीवक किंवा अमृतपाण्याससाठी खड्डा२०००/-
१३)शेततळे३२९९७०/-
१४)शेतक – याच्या शेत बाधावर वृक्ष लागवड५६७१६/-
१५)गाय गोठे७७१८८/-
१६)फळबाग लागवडहेक्टरी झाडेप्रमाणे
१७)नाडेप कंपोस्टीग१६५०४/-
१७)नाडेप कंपोस्टीग१६५०४/-
१८) इतर वैयक्तिक लाभ
मंजूर निधी झालेल्या कामाप्रमाणे कमी होऊ शकतो.

लाभार्थीची पात्रता व कागदपत्रे :-

३ )लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील आहे का ? असल्यास बरोबर टिक करावा

(प्रवर्गानुसार त्यासंबंधी कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.)

१ ) अनुसूचित जाती, २ ) अनुसूचित जमाती, ३ ) भटक्या जमाती ( NT ), ४ ) भटक्या विमुक्त जमाती ( DT ), ५ ) दारिदय रेषेखालील इतर कुटुंब , ६ ) महिलाप्रधान कुटुंब, ७ ) शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, ८ ) भूसुधार योजनेचे लाभार्थी, ९ ) प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, १० ) कृषी कर्जमाफी २००८ नुसार अल्प भुधारक ( १ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर ( पएकर ) पर्यत जमीन असलेला शेतकरी ( जमीन मालक / कुळ ) व सीमांत शेतकरी ( १ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी ),

४) लाभार्थीच्या नावे जमिन / जागा आहे का ? होय / नाही

( असल्यास सोबत ७/१२ , ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ चा उतारा जोडावा )

( भुमिहीन शेतक – यासाठी ग्रामपंचायत नमुना ८ जोडावा )

५ ) लाभार्थी सदर गावाचा असल्याबाबत दाखला जोडलेला आहे काय ? होय / नाही

( असल्यास सोबत रहिवासी दाखला जोडावा )

६ ) लाभाथी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जोडली आहे काय ? होय / नाही

७ ) लाभार्थीने निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत आहे काय ? होय / नाही

८ ) सदर अर्ज सोबत कामाच्या प्रकारानुसार सदर कामांसंबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक राहतील

९ ) अर्जदार कुटुंबातील १८ वर्षावरील सदस्यांची संख्या – पु .——– + स्त्री– = एकुण

मी श्री / श्रीमती घोषित करतो / करते कि , मी योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजुर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देय दराने अकुशल काम करण्यास तयार आहे . तसेच मी वर नमुद केलेली माहिती माझ्या समजुती व माहिती प्रमाणे बरोबर आहे . सदर योजनेचा गैरवापर केल्यास किंवा वर नमूद तपशील खोटा निघाल्यास राज्य / केंद्र शासनाने ठरविलेली वसूली करून घेण्यास माझी पूर्ण संमती आहे .

अर्जदाराची सही / डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा नाव

अर्ज डाउनलोड येथे करा 👇

Downlaod Here

टिप-

१ ) योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो काम सुरू करण्यापूर्वीचा , चालु असतांनाचा व पूर्णत्वाचा या तीन प्रकारामधील फोटो अंतिम देयकासाठी व कामपूर्णत्वाच्या दाखल्यासोबत सादर करणे बंधनकारक राहील .

२ ) सदरचे काम मंजुर झाल्यास योजनेअंतर्गत शासननिर्णयातील नियम व अटी नुसार व योग्यत्या तांत्रीक मार्गदर्शना नुसार काम पूर्ण करणे बंधनकारक राहील .

योजनेचे ठळक वैशिष्टे :

१ ) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास किमान १०० दिवस रोजगाराची हमी . २ ) ज्या कुटुंबाकडे जॉब कार्ड नसतील त्यांनी ग्रामपंचायतीस संपर्क करावा .

३ ) कामाची मागणी करणारा अर्ज आपल्या ग्रामपंचायतीकडे करा .

४ ) मागणी केल्यानंतर १५ दिवसांत काम उपलब्ध करून देण्याची संपुर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील

५ ) नियमानुसार यंत्र सामुग्री वापर करणे .

वरील प्रमाणे आपल्याला वैयक्तिक अनुदान अर्ज भरावा लागेल आणि आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करावा लागेल तुम्हाला या अर्जाचा नमुना प्रत्येक जिल्ह्यसाठी वेगवेगळा असू शकतो. हा अर्ज आपण डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून मिळवा. आणि टेलिग्राम ग्रुप वर जॉईन व्हा.

खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा अधिक माहिती साठी .

shivsurya: