रमाई आवास घरकुल योजना हि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी आहे. या योजने अंतर्गत नवीन घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान साधारणतः १,५३,४२०/- ( एक लाख त्रेप्पन हजार चारशे वीस इतके ) मिळले जाते . आणि हे अनुदान आपले कामाच्या टप्प्याटप्याने आपल्या बँक खात्यावर जमा केले जाते.
अनुदान किती मिळाले जाते पहा ?
- घर बांधकाम अनुदान १२,००००/-
- शौचालय स्वच्छ भारत मिशन मधून १२,०००/-
- MREGA रोजगार हमी मधून मजुरी २१,४२०/-
नियम व अटी व (कागदपत्रे ) :-
१) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वर्गातील असावा.
( जातीचे प्रमाणपत्र )
२) लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
( रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे )
३) लाभार्थी बेघर असावा किवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
( ग्रामपंचायत प्रमाणपत्र )
४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रुपये १.०० लाख राहील.
( उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार )
५ ) लाभार्थी सामाजिक, आर्थिक इ जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या निकशाबाहेरील आहे का
( ग्रामपंचायत प्रमाणपत्र )
रमाई आवास घरकुल योजना अर्ज डाउनलोड
मित्रहो नवीन अधिक माहितीसाठी खालील इन्स्टा फेसबुक ला Follow करा