बेबी केअर कीट योजना मराठी PDF Download

बेबी केअर कीट योजना महाराष्ट्र शासनाने  26 जानेवारी 2019 पासुन सुरु करण्यात आली आहे. आपल्याला  शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला 2 हजार रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगातील “बेबी केअर किट” चा लाभ मिळणार आहे.

या बेबी केअर कीट मध्ये आपल्याला  काय काय पुरविले जाणार आहे.

शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व प्रसुत झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर कीट मिळणार यामध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी अंगाला लावायला तेल, बॅल्केट, प्लास्टीक चटई, शाम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे – पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश लिक्विड झोपण्याची लहाण गादी इ प्रकारचे व सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग  यांचा समावेश आहे.

बेबी केअर कीट योजनेचा अर्ज नमुना

मित्रहो बेबी केअर कीट योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 1 अर्ज करावा लागणार आहे यामध्ये आपल्याला अंगणवाडी सेविका यांची मदत लागणार आहे हा फार्म तुम्हाला या वेबसाईट मिळून जाईल तेथून तुम्ही डाऊनलोड करा.

shivsurya: