नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

१) नमुना ६ :- नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

२) नमुना ७ :- मतदार नोंदणी वगळणीसाठी  आवश्यक कागदपत्रे.

२) नमुना ८ – मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

४) नमुना ८ अ :- एकाच मतदार संघातील मतदार एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

नमुना ६ नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • १. आयडेंटीटी  साईझ १ फोटो
  • २. रहिवासी पुरावा :- ( खालीलपैकी एक )

    रेशनकार्ड झेरॉक्स, वीज लाईट बिल, टिलिफोन बिल, भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र,पाणी पट्टी बिल इ.

टीप :- लग्न झालेल्या मुलींचे बाबतीत रेशन कार्ड वर नाव नोंद मसल्स विवाह नोंद दाखल अथवा लग्न पत्रिका जोडावी.

  • ३. जन्माचा पुरावा :- ( खालीलपैकी एक )

     जन्म नोंद दाखला झेरॉक्स, पॅन  कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसन्स झेरॉक्स, १०वी प्रमाणपत्र इ.

  • ४. वय वर्ष २१ पेक्षा अधिक असलेस जोडपत्र ३ भरून जोडावे .

नमुना ७ – मतदार नोंदणी वगळणीसाठी  आवश्यक कागदपत्रे.

  • १. मयत मतदारांच्या बाबतीत मृत्यूनोंद दाखला जोडावा अथवा कुटूंबातील व्यक्तींचे जबाब जोडावे.
  • २. स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत ज्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत त्या ठिकाणचे रहिवासी पुरावा घ्यावे .
  • ३. स्थलांतरित मुली / लग्न झालेल्या मुलींचे बाबतीत विवाह नोंद दःखला अथवा लग्न पत्रिका जोडावी.
  • ४. दुबार नोंद असलेले मतदारांच्या बाबतीत त्याच केंद्रात अथवा इतर केंद्रात दुबार नोंद असलेली झेरॉक्स परत जोडावी.

नमुना ८ – मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • १. जन्म तारीख दुरुस्ती :- ( खालीलपैकी एक )

  जन्म नोंद दाखल झेरॉक्स, पॅन  कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसेन्स झेरॉक्स, १० प्रमाणपत्र इ .

  • २. छायाचित्र दुरुस्ती

   आयडेंटिटी साईझ १ फोटो

  • ३. पत्ता दुरुस्ती :- ( खालीलपैकी एक )

  रेशनकार्ड झेरॉक्स, वीज बिल, टिलिफोन बिल,भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र, पाणी पट्टी बिल ई.

  • ४. मतदारांचे नाव अथवा नातेवाईंकाचे नाव अथवा नाते संबंध दुरुस्ती – ( खालीलपैकी एक )

रेशन कार्ड झेरॉक्स जन्म नोंद दाखल झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसेन्स झेरॉक्स, १० प्रमाणपत्र इ .

नमुना ८ अ एकाच मतदार संघातील मतदार एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

( महत्वाची सूचना – लग्न झालेल्या मुलींना हा अर्ज वापरू नये )

  • 1. मतदार ज्या केंद्रात स्थलांतर होत आहे त्या केंद्रातील खालील पैकी एक रहिवासी पुरावा जोडावा.

  2.  रेशनकार्ड झेरॉक्स, वीज लाईट बिल, टिलिफोन बिल, भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र,पाणी पट्टी बिल इ.

sagar suryawanshi: